Blogger वर ब्लॉग कसा बनवायचा?

तर मित्रानो आज आपण बघणार आहोत Blogger वर ब्लॉग कसा बनवायचा? आणि त्याला कस्टम डोमेन कस जोडायचं.

Blogger बद्दल थोडक्यात

ब्लॉगर हे एक गुगल च प्रॉडक्ट आहे जिथे आपण फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकतो. आणि आपल्या मनातल्या भावना ब्लॉगद्वारे इत्तरांपर्यंत पोहचवू शकतो.

ब्लॉगर वर फ्री sub domain मिळत आणि Hosting हि फ्री असत.

ब्लॉगर हा ब्लॉगिंगचा असा प्लॅटफॉर्म आहे जिथं पूर्णपणे नवीन व्यक्ती ही चांगला ब्लॉग स्वतःच बनवू शकतो.

ब्लॉगर वर अकाउंट बनवण्यासाठी फक्त gmail अकाउंट ची आवश्यकता असते. आपल्याकडे असलेल्या gmail द्वारे आपण सहज अकाउंट बनवू शकता.

इतर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पेक्षा blogger चा प्लॅटफॉर्म वापरायला एकदम सोपा आणि सरळ आहे. आणि याच App पण उपलब्ध आहे.

त्यामुळे मोबाइल वरून पण आपण ब्लॉगपोस्ट लिहू शकता.

तर आता आपण बघू कि अकाउंट कस ओपन करायचं.

Blogger मध्ये account

आपल्या Mobile/pc /laptop मध्ये कोणताही browser (chrome, uc browser) ओपन करा आणि Blogger सर्च करा. किंवा येथे क्लिक करा

येणाऱ्या पहिल्या website वर क्लिक करा. sign up चा पर्याय येईल, आपले नाव भरून sign up करा.

त्यानंर तुमच्या समोर अशी विंडो येईल.

Title मध्ये तुमच्या ब्लॉग च नाव द्या. उदा. तुम्हाला कवितांचा ब्लॉग बनवायचा आहे, तर तुम्ही “My Poem” किंवा “माझी कविता” असं मराठी नावही देऊ शकता.

त्याच्यानंतर येतो address बार, यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा ऍड्रेस द्यायचा आहे.

म्हणजे जर तुम्ही My poem हे नाव ब्लॉग ला दिल असेल तर तुम्ही mypoem.blogspot.com असा addres देऊ शकता.

पण तो address जर कोणी आधीच घेतलेला असेल तर तो address तुम्हाला नाही भेटणार.

त्या वेळी आपण आपल्या address मध्ये बदल करावा उदा. mypoem१२३.blogspot.com. जर आपण निवडलेला adress available असेल तर तो आपल्याला लगेच मिळून जाईल.

त्याच्या नंतर ऑपशन येतो तो थिम चा.

तिथे खाली काही थिम दिल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती थिम तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी निवडू शकता.

आता तुमचा ब्लॉग तयार झाला पण यांच्यात setting करणं बाकी आहे अजून.

अशी विंडो आता तुमच्या समोर असेल.

Blogger सेटिंग

खाली दाखवलेल्या प्रमाणे अशी विंडो तुमच्या समोर अली असेल. डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये सेटिंग चा ऑपशन आहे, त्याच्यावर क्लिक करून त्याची सेटिंग आपण करू शकतो.

Basic setting

Title – आपल्याला जर आपल्या ब्लॉग चे title म्हणजेच शीर्षक बदलायचे असेल तर तुम्ही edit वर क्लिक करून बदलू शकता. तुम्हाला आवडेल ते title तुम्ही वापरू शकता.

Description – या भागात आपण आपल्या ब्लॉगविषयी थोडक्यात लिहायचं असत. म्हणजे आपला ब्लॉग मध्ये कोणत्या पोस्ट असतील, कोणते विषय असतील. एकंदरीत काय तर वाचकाला समजलं पाहिजे कि ब्लॉग कोणत्या विषयाशी निगडित आहे. edit बटनावर क्लिक करून तुम्ही description लिहू शकता.

Privacy – जर तुम्हाला तुमचा ब्लॉग काही कारणांमुळे लोकांपासून लपवायचा आहे तर तुम्ही या function चा वापर करू शकता. edit बटनावर क्लिक करून तुम्ही सेटिंग बदलू शकता.

blog address – ब्लॉग ऍड्रेस म्हणजे तुमच्या ब्लॉगची लिंक किंवा आपण त्याला URL असं म्हणतो. हे URL आपण कधीही बदलू शकतो. edit बटनाद्वारे आपण ते बदलू शकता.

HTTPS redirect – हे आपल्याला कायम Yes ठेवायचं आहे. नाही ठेवलं तर तुमच्या ब्लॉगची सुरक्षितता निघून जाईल. त्यामुळे हे नेहमी Yes ठेवायचं. यामुळे तुमची website/blog सुरक्षित राहील.

Post, comments and sharing

Show at most – या ऑपशन द्वारे आपण आपल्या blog मध्ये एका पेजवर किती पोस्ट दाखवायच्या हे निश्चित करू शकता. सामन्यात ७ पोस्ट homepage दिसतात, आपल्याला जर बदल करायचा असेल तर आपण करू शकता.

Who can comment – म्हणजे कोण तुमच्या ब्लॉगवर कंमेंट करू शकत. याला नेहमी User with Google Accounts या ऑपशन वर ठेवा. जर आपण Anyone हा ऑपशन निवडला तर आपल्या ब्लॉगवर स्पॅम कंमेंट्स येऊ शकतात ज्या फेक असतात.

Comment Moderation – याला Always सेट करा आणि आपला email टाका. तुमच्या ब्लॉगवर जर कोणी कंमेंट केली तर ती दिसली पाहिजे कि नाही हे ठरवणे म्हणजे Comment Moderation. हे सिलेक्ट केल्यावर तुमच्या परवानगीशिवाय कोणीही कंमेंट करू शकत नाही.

comment from message – कंमेंट करताना visitor ला कोणतं वाक्य दिसावं ते आपण इथे देऊ शकता. उद. “तुमचे मत मांडा”

Email

Comment Notification Email – यांच्यामध्ये तुमच्या ई-मेल टाका. त्यामुळे तुमच्या ब्लॉगवरती कोणी काहीही कंमेंट केली तर तुम्हाला आधी mail येईल. तुम्ही जर परवानगी दिली तरच ती कंमेंट तुमच्या ब्लॉगवर दिसेल.

Language and Formatting

Language – भाषा तुम्हाला जी हवी ती निवडू शकता यांच्यामध्ये मराठी पण आहे, पण फार काय बदल नाही होत. वेळ, दिनांक आणि वार मराठीत दिसतील. तुम्हाला ज्या भाषेत ब्लॉग बनवायचा आहे ती भाषा निवडू शकता.

Enable transliteration – जर तुमचा ब्लॉग English मध्ये असेल आणि तुम्हाला तो महाराष्ट्रातील लोकांना मराठीत दिसावा असं हवं असेल तर या ऑपशनद्वारे आपण ते करू शकता. आपल्याला ज्या भाषेत ब्लॉग दिसायला हवा त्या भाषेत तुम्ही visitors ना ब्लॉग दाखवू शकता.

Time Zone – (GMT =५:३०+) हा भारतीय time zone निवडा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला भारतीय वेळेनुसार मिळतील.

Search and Preferences

Description – हे जे description आहे ते search result मध्ये दिसणार आहे, म्हणजेच जर तुमचा ब्लॉग कोणी google वर सर्च करत असेल तर त्याला जे description दिसणार आहे ते हे आहे.

यांच्यात तुम्हाला तुमच्या ब्लॉग च वर्णन १५० अक्षरात करायचं आहे. साधारणतः १५-२० शब्दामध्ये आपल्या ब्लॉग ला प्रस्तुत करायचं आहे.

Custom robots.txt – हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे जोपर्यंत तुम्ही चालू करणार नाही तोपर्यंत google ला समजणार नाही कि तुम्ही ब्लॉग बनवला आहे.

robots.txt हि file मिळवण्यासाठी search बार मध्ये (तुमच्या ब्लॉगचं url)/robots.txt असं type करा. उदा. mypoem.blogspot.com/robots.txt

असं सर्च केल्यानंतर (कोणत्याही browser मध्ये) तुम्हाला robots.txt file मिळेल.

हि सर्व महत्वाची setting होती, इतर गोष्ट सुद्धा आहेत पण त्या सुरवातीला इतक्या महत्वाच्या नाहीत.

आता आपण ब्लॉगसाठी चांगली थिम कशी निवडायची ते बघू.

Blog Theme

ब्लॉगर मध्ये काही बेसिक थिम दिलेल्या आहेत. त्या खूपच जुन्या आणि दिसायला इतक्या सुंदर नाहीत.

जर आपल्याला सुंदर आणि नीटनेटक्या थिम पाहिजे असतील तर त्या तुम्हाला गोयाबी टेम्प्लेट्स या website वर मिळतील.

एकापेक्षा एक अप्रतिम थीम इथे उपलब्ध आहेत. जी थीम आपल्याला आवडेल त्या थीम च free version डाउनलोड करून आपण ती थीम आपल्या ब्लॉगसाठी वापरू शकता.

नवीन थीम लागू करण्यासाठी

Layout >> backup/restore >> choose file (आपण डाउनलोड केलेली file (.xml) इथं अपलोड करा.

त्यानंतर तुमची नवीन थीम ब्लॉगर वर लागू होईल.

जर काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली कंमेंट करा मी आहेच तुमच्या मदतीला.

Be the first to reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *