कोरोनाच्या रुग्णांमध्ये आढळलीत ही ‘दोन’ नवी लक्षण

कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या वाढत चालली आहे.

त्यामुळे काही लोक भयभीत झालेली आहेत. शिंक जरी अली तरी कोरोना झाल्याची भीती मनात येते. हे स्वाभाविकच आहे कारण कोरोना व्हायरस ची लक्षण आणि सर्वसाधारण सर्दी, ताप, खोकला यांची लक्षण ही बऱ्यापैकी सारखीच आहेत.

मग मनात प्रश्न येतो कोरोना झाला तर समजणार कस ?

नुकत्याच झालेल्या संशोधनात कोरोनाच्या नवीन दोन लक्षणांचा समावेश झाला आहे. कोरोना झालेल्या लोकांपैकी ६० % लोकांमध्ये ही लक्षण दिसून आलीत.

कोरोनाची लक्षण (covid-१९)

सर्वसाधारण ज्यांना कोरोना व्हायरस ची लागण झालेली असते त्यांना लक्षणं दिसायला २-१४ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी वय, लिंग, रोग प्रतिकार क्षमता यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो.

ज्यांची रोग प्रतिकार क्षमता कमी असते त्यांना या रोगाची लक्षणं लवकर दिसायला सुरु होतात, तर याउलट ज्यांची रोग प्रतिकार क्षमता जास्त असते त्यांना या रोगाची लक्षण दिसायला जास्त वेळ लागतो.

कोरोना व्हायरस ची जी सर्वसाधारण लक्षण आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.

 • ताप
 • खोकला (कोरडा)
 • थकवा
 • श्वसनात अडथळा
 • जुलाब (काही लोकांमध्ये)
 • उलट्या (काही लोकांमध्ये)

जुलाब आणि उलट्या सोडलं तर सर्वच लक्षण आपल्याला हा रोग झालेला नसतानाही दिसतात. जुलाब आणि उलटी होणे हे प्रकार एकदम कमी लोकनामध्ये पाहायला मिळाले आहेत.

नुकत्याच झालेल्या परीक्षणात डॉक्टरांना अजून दोन लक्षणांची माहिती मिळाली जी कोरोनाग्रस्त व्यक्तींमध्ये दिसलीत ती खालिलप्रमांणे आहेत.

 • जिभेची चव जाणे
 • वास न येणे

हि दोन लक्षण डॉक्टरांना सापडली आहेत. कोरोना बाधित रुग्णांना चव ओळखण्यात आणि वास ओळखण्यात अडथळा येतो. त्यांची वास घेण्याची आणि चव ओळखण्याची क्षमता कमी होते.

कोरोनाचा विषाणू या गोष्टीवर पहिल्यांदा हल्ला करतो. पण ज्यावेळी रुग्ण बरा होईल त्या वेळी त्याच्या सर्व क्षमता पूर्वीसारख्या होतात.

या झालेल्या परीक्षणामुळे डॉक्टरांना आणि संशियिताना कोरोना झालेल्याची अथवा न झालेल्याची खात्री पटायला ओळख होते.

पण हि लक्षण सर्वांमध्ये दिसतीलच असे नाही. कोरोनाचा प्रभाव त्या व्यक्तीवर किती झालेला आहे यावर अवलंबून असत कि त्याला कोणती लक्षण दिसतात.

सर्दी, खोकला, ताप जर ९-१० दिवसांच्या पेक्षा जास्त वेळ जात नसेल तर कोरोची टेस्ट करणं महत्वाच आहे.

काही असेदेखील रुग्ण सापडले आहेत ज्यांना वरीलपैकी एकही लक्षण दिसत नसूनही ते कोरोना बाधित आहेत.

कस स्वतःला वाचवायचं ?

 • सुट्टी आहे घरात करमत नाही म्हणून मित्रांकडे जाऊ नका. (काय माहित तो कोणाच्या संपर्कात आला असेल)
 • मास्क नाही वापरलं तरी चालेल पण हात धुवा (कारण संपर्कात आल्यावर एकवेळ कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचू शकतो पण हाताला लागलेला जंतू जर पोटात गेला तर १००% कोरोनाला बळी पडणार.
 • कोणतही पॅकिंग स्वीकारताना साबणाने नीट स्वच्छ धुवूनच घ्या ( कारण, किती लोकांनाही त्याला हात लावलेला असेल त्यामध्ये कोरोमा बाधित व्यक्ती असू शकतो)
 • बाहेर जाऊच नका (जर वाटत असेल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोनाची लागण व्हायला नको )

कोरोनाची आजतागायत कोणतीही लस उपलब्ध नाही त्यामुळे स्वतःला आणि कुटुंबाला या रोगापासून वाचवणं तुमच्या हातात आहे.

तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या अख्या घरात कोरोना पसरवू शकत आणि त्यात जर कोणी ६० वर्षाच्या पुढचं असेल तर मग त्यांच्या जीवाला धोका आहे.

हा रोग इतका भयंकर असा नाही पण काही काळानंतर अशी वेळ येईल रुग्ण इतके वाढतील कि त्यांना उपचार करायला डॉक्टर्स आणि दवाखाने उपलब्ध नसतील. रुग्ण वाचवण्याच्या परिस्थितीत असूनही त्याला आपला जीव गमवावा लागेल.

देशासाठी राहूद्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तरी वेळीच सतर्क व्हा.

एकदा याच प्रमाण वाढलं तर यातून तुम्हाला वाचवायला कोणी नसेल.

अशा प्रकारची माहिती तुमच्या मोबाइल ऑटोमॅटक पाहिजे असेल तर अतच घंटी (bell) वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *