ब्लॉगसाठी ‘डोमेन’ कस खरेदी करायचं?

नमस्कार मित्रानो मागच्या पोस्ट मध्ये आपण पाहिलं ब्लॉग म्हणजे काय? आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. आता आपण पाहणार आहोत ब्लॉगसाठी लागणार डोमेन कस खरेदी करायचं.

स्वागत आहे तुमचं बॉलमराठी.कॉम या ब्लॉगमध्ये. ब्लॉग बनविण्याची सर्व माहिती आपल्या मोबिलेवर ऑटोमॅटिक मिळवण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील बेल (घंटा) वर क्लिक करा. त्यामुळे सर्व पोस्ट चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.

bolmarathi.com

डोमेन खरेदी करण्याच्या अगोदर आपण बघू की योग्य डोमेन कस निवडायचं?

योग्य डोमेन निवडणे

डोमेन हि अशी गोष्ट जी जर ते एकाने आधीपासून घेतलं असेल तर तेच डोमेन आपण खरेदी करू शकत नाही. म्हणजेच एक डोमेन एकाच व्यक्तीकडे असू शकत.

समजा marathisahitya.com हे डोमेन जर तुम्ही खरेदी केलं तर तेच डोमेन दुसरा कोणीही व्यक्ती ते डोमेन खरेदी करू शकत नाही.

जर तुम्हाला ही तसेच डोमेन हवं असल्यास तुम्ही वेगळं एक्स्टेंशन घेऊ शकता (जर उपलब्ध असेल तर). उदा : marathisahitya.in किंवा marathisahitya.org

मागच्या पोस्ट मध्ये आपण पाहिलं की डोमेन चे वेगवेगळे एक्स्टेंशन काय असतात. ही काही डोमेन एक्स्टेंशन आहेत .in, .net, .org, .blog, .co, .com, .info, .tech, .shop, .online, .site, .space

डोमेन ची विविध एक्स्टेंशन

इतकी डोमेन ची एक्स्टेंशन उपलब्ध असली तरीही आपण आपल्या ब्लॉगसाठी .in किंवा .com हेच एक्स्टेंशन घेण्याचा प्रयत्न करायचा.

मुख्यतः सर्वत्र .com हे एक्स्टेंशन वापरलं जात.

आपण आपल्या ब्लॉग साठी काहीतरी वेगळं आणि unique नाव शोधा ज्यामुळे त्याच डोमेन कुणीही घेतलेलं नसेल आणि तुम्हाला सहज मिळून जाईल.

समजा, तुमचा कवितांचा ब्लॉग आहे. तर त्यासाठी तुम्ही mynewpoem.com असं डोमेन घेऊ शकता किंवा poemlover.com.

.com हे एक्स्टेंशन उपलब्ध नसेल तर .in पहा ते हि नसेल तर .org पहा.

शक्यतो .com आणि .in सो एक्स्टेंशन घेऊ नका. कारण लोकांनाही (visitors) काही एक्स्टेंशन माहिती नसतात. त्यामुळे तुमचा ब्लॉग लोकांच्या लक्षात राहत नाही.

आता तुम्हाला डोमेन कस निवडायचं हे समजलं असेल तरीही काही शंका असतील तर comment करा.

डोमेन रेजिस्टर कुठून करायचं?

डोमेन रजिस्टर करण्यासाठी खूप रेजिस्ट्रार उपलब्ध आहेत, त्यापैकी तुम्हाला जो आवडेल, स्वस्त भेटेल तिथून तुम्ही डोमेन विकत घेऊ शकता.

काही डोमेन रेजिस्ट्रारची यादी दिली आहे यामधल्या कोणत्याही रेजिस्ट्रारकडून तुम्ही डोमेन घेऊ शकता.

  • Godaddy
  • Bigrock
  • Namecheap
  • Hostinger
  • Google
  • hostgator
  • reseller club

असे खूप डोमेन रेजिस्ट्रार आहे ज्यांच्याकडून तुम्ही डोमेन खरेदी करू शकता.

पण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही होस्टिंग पण विकत घेणार असाल तर माझं मत तुम्ही Hostinger या रेजिस्ट्रार कडून डोमेन विकत घ्या कारण इथे होस्टिंग स्वस्त भेटत आणि डोमेन आणि होस्टिंग एकमेकांना कनेक्ट करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही.

होस्टिंग विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून होस्टिंग खरेदी करायचं हे फार महत्वाचं असत. त्यामुळे होस्टिंग लगेच घेऊ नका.

येणाऱ्या पुढच्या पोस्ट मध्ये कोणतं होस्टिंग घ्यायचं, त्याचे फायदे व तोटे, features काय आहेत हे सर्वची माहित दिली जाईल.

Hostinger कडून डोमेन कस खरेदी करायचं?

Hostinger ची सर्विस चान्गली आहे, एक वर्ष होत आलेलं आहे मला त्यांची सर्विस वापरून.

डोमेन विकत घेण्यासाठी मोबाइल मध्ये browser (Chrome, UC browser) उघडून search करा Hostinger domain.

तुम्हाला search result दिसेल त्यामध्ये domain checker वर क्लिक करा.

तुमच्या समोर एक सर्च बार ओपन होईल.

या search बार मध्ये तुम्हाला हवं असेल ते डोमेन type करा. ते तुम्हाला सांगेल कि कोणतं डोमेन उपलब्ध आहे.

समजा तुम्हाला majhemanogat.com हे डोमेन घ्यायचं आहे आणि ते जर उपलब्ध नसेल तर तुम्ही .com च्या जाग्यावर .in हे उपलब्ध असेल तर ते घेऊ शकता.

किंवा डोमेन च्या स्पेलिंग मध्ये बदल करून ते घेऊ शकता.

जर तुम्हाला हवं असलेलं डोमेन जर उपलब्ध असेल तर तुम्ही add to cart वर क्लिक करून दोन मिनिटात डोमेन विकत घेऊ शकता.

त्यासाठी तुम्हाला होस्टींगर च अकाऊंट तयार करावं लागेल जे ई-मेल आणि मोबाईल नो. टाकून लगेच create होत.

Hostinger वर वेगवेगळे payment ऑपशन्स आहेत जस की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI (google pay, phonepe, Paytm) आणि नेट बँकिंग असे भरपूर ऑपशन आहेत.

payment पूर्ण झाल्यानंतर डोमेन तुमच्या अकाउंट मध्ये येईल.

ही प्रोसेस करताना तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला तर तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकता.

किंमत

डोमेन ची सामान्य किंमत ही ८०० ते ९००/- Rs इतकी असते पण पहिल्यांदा खरेदी करताना त्यावर डिस्काउंट मिळतो.

डिस्काउंट किती असेल हे त्या कंपनी वर अवलंबून असते. त्यामुळे डोमेन आपल्याला साधारणता ५०० ते ६०० रुयांपर्यंतच्या भेटेल..

कधी कधी कमी किमतीत पण भेटत, त्या वेळी चालू असणाऱ्या ऑफर काय असेल तशी डोमेन ची किंमत बदलते.ल

Conclusion

या पोस्ट मध्ये आपण बघितलं की डोमेन कस निवडायचं, डोमेन चे वेगवेगळे रेजिस्ट्रार कोणकोणते आहेत आणि Hostinger कडून डोमेन कस विकत घ्यायचं.

मागच्या पोस्ट मध्ये आपण बघितलं ब्लॉग कसा बनवायचा आणि ब्लॉग बनवताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. खर्च किती येतो आणि इनकम किती मिळतो.

येणाऱ्या पुढच्या पोस्ट मध्ये आपण बघू Hosting कस निवडायचं, कोणाकडून घ्यायचं आणि आपल्याला होस्टिंग मधल्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. अशी सर्व माहिती आपण पुढच्या पोस्ट मध्ये बघू.

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *