Professional ब्लॉग कसा बनवायचा?

मित्रांनॊ या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत ब्लॉग म्हणजे काय, तो कसा बनवतात, कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि त्यातून पैसे कसे कमावता येतात.

बॉलमराठी.कॉम या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. जर तुमहाला ब्लॉगिंग विषयी माहिती ऑटोमॅटिक आपल्या मोबाइलला वर हवी असल्यास उजव्या कोपऱ्यातल्या बेल (घंटा) वर क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या नवीन पोस्ट चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.

Bolmarathi.com

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे म्हणजे अशी website ज्याच्यावर फक्त माहिती असते. मग ती माहिती कोणतीही असो ज्याच्याजवळ ज्या क्षेत्रातील सखोल ज्ञान असेल तो त्या विषयीची माहिती ब्लॉग मध्ये पोस्ट करू शकतो.

आता आपल्याला ब्लॉग म्हणजे काय असत हे थोडक्यात समजलं असेलच.

ब्लॉग बनवताना काही गोष्टींची आवश्यकता असते त्या कोणत्या आहे ते आपण आता पाहू.

ब्लॉग साठी लागणाऱ्या गोष्टी

 • डोमेन
 • होस्टिंग

कोणताही ब्लॉग (website) बनवताना दोन मुख्य गोष्टींची आवश्यकता असते. त्यामध्ये एक आहे डोमेन आणि दुसरं म्हणजे होस्टिंग.

तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊ हे असत तरी काय?

डोमेन (Domain) म्हणजे काय?

डोमेन म्हणजे website चा address. आपल्या घराला जसा एक निश्चित पत्ता असतो तसाच पत्ता ब्लॉग/website साठी पण असतो.

गोंधळून जाऊ नका, सोपं आहे एक उदाहरण देतो म्हणजे लगेच समजेल तुम्हाला.

उदा: आपण ज्या ब्लॉगमध्ये माहिती वाचत आहात या ब्लॉग च नाव आहे bolmarathi.com हे झालं त्याच डोमेन.

थोड्ल्यात काय तर website/ब्लॉग च नाव आणि त्याच्यापुढे . (डॉट) आणि एक्स्टेंशन

 • उदा: ब्लॉगचं नाव.एक्स्टेंशन
 • उदा: bolmarathi.com (bolmarathi हे ब्लॉग च नाव .com हे झालं एक्स्टेंशन)
 • उदा: bolmarathi.in (bolmarathi हे ब्लॉग च नाव .in हे झालं एक्स्टेंशन)

डोमेन चे वेगवेगळे एक्स्टेंशन असतात. जस कि .com, .in, .org, .net, .co, .gov अशी बरीच एक्स्टेंशन उपलब्ध आहेत.

.com हे एक्स्टेंशन प्रामुख्याने वापरलं जात. आपण इंडियात रोहतो त्यामुळे .in हे सुद्धा आपण वापरू शकतो.

डोमेन खरेदी कस करायचं?

आपण वेगवेगळ्या रेजिस्ट्रार कडून डोमेन रजिस्टर करू शकतो. वेगवेगळ्या रेजिस्ट्रारकडे डोमेन च्या वेगवेगळ्या किमती असतात.

Godaddy, bigrock, hostinger, namecheap, तसेच google कडून सुद्धा आपण डोमेन खरेदी करू शकतो.

साधारणतः एका डोमेन ची किंमत ६००-९००\- रु पर्यंत असू शकते. (१ वर्षासाठी)

डोमेन रजिस्टर कस निवडायचं, कोणतं एक्स्टेंशन घ्यायचं, रेजिस्ट्रेशन कस करायचं हे आपण पुढच्या पोस्ट मध्ये सविस्तर बघू. एकाच पोस्ट मध्ये सगळी माहिती दिली तर पोस्ट खूपच मोठी आणि बोअरिंग होईल.

आता आपण बघू होस्टिंग म्हणजे काय असत, त्याची काय आवश्यकता असते आणि ते खरेदी कुठून करायचं.

होस्टिंग (Hosting) म्हणजे काय?

आपण जो ब्लॉग बनवणार आहोत त्यामध्ये टेक्स्ट असेल, फोटो असतील आणखी काही डेटा असेल तो कुठे तरी save करावा लागतो त्याच्यासाठी लागणार space किंवा storage म्हणजे hosting.

जर आपण ब्लॉगर वापरणार असाल तर google च free होस्टिंग आपण वापरू शकतो. आणि जर वर्डप्रेस वर ब्लॉग बनवणार असाल तर होस्टिंग विकत घ्यावं लागत.

वर्डप्रेस आणि ब्लॉगर हे दोन ब्लॉग बनवण्याचे प्लॅटफॉर्म आहेत. यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

होस्टिंग खरेदी करण्यासाठी आपण जिथून डोमेन घेतो तिथूनच खरेदी करू शकतो. ज्यामध्ये Godaddy, bigrock, hostinger, namecheap या कंपन्यांचा समावेश होतो.

पण किंमत आणि feature नुसार होस्टिंग कोणतं घ्यायचं हे ही आपण सविस्तर नवीन पोस्ट मध्ये बघू. आता फक्त तोंडओळख करून घेत आहोत..

आता आपल्याला डोमेन आणि होस्टिंग यांची तोंडओळख झाली असेल. आता आपण बघू ब्लॉगिंग चे प्लॅटफॉर्म कोणते आहेत?, योग्य कसा निवडायचा?

ब्लॉगिंगचे प्लॅटफॉर्म

ब्लॉगिंग चे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत त्यापैकी blogger आणि WordPress हे थोडे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहेत. तर आता आपण जाणून घेऊ दोघांची वैशिष्ट्ये, फायदे आणि तोटे.

Blogger (ब्लॉगर)

ब्लॉगर हे एक google च प्रॉडक्ट हे जे संपूर्ण फ्री आहे. इथे डोमेन ही फ्री मध्ये भेटत पण त्या फ्री डोमेन ला .blogspot.com हे एक्स्टेंशन येणारच (उदा: bolmarathi.blogspot.com) त्यामुळे हे फ्री च डोमेन शक्यतो कोणी वापरत नाही.

पण इथे होस्टिंग पूर्णपणे फ्री भेटत ते हि उत्तम दर्जाचं.

आता आपण ब्लॉगर या प्लॅटफॉर्म चे फायदे आणि तोटे बघू.

फायदे

 • पूर्णपणे फ्री
 • वापरायला सोपं
 • विनाखर्च ब्लॉग बनवता येतो.
 • अव्व्ल दर्जाचं होस्टिंग.

फ्री आहे याच अर्थ यांच्यात काहींना काही तोटे आहेत म्हणूनच तर फ्री आहे.

तोटे

 • मर्यादित features
 • हा प्लॅटफॉर्म जुना होता तसाच आहे, अपडेटेड नाही.
 • अद्यावत गोष्टी करू शकत नाही.

सुरवातीच्या काळात जर बजेट कमी असेल तर आपण या प्लॅटफॉर्म चा वापर करू शकता, पण एक ना एक दिवस तुम्हाला तुमचा ब्लॉग शिफ्ट करावाच लागणार आहे. कारण ब्लॉगर मध्ये प्रत्येक गोष्टीत मर्यादा येतात.

आता आपण WordPress बद्दलची माहिती घेऊ. त्याचे फायदे, तोटे थोडक्यात जाणून घेऊ.

WordPress (वर्डप्रेस)

वर्डप्रेस हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर सर्व प्रोफेशनल ब्लॉग चे लेखक याचा वापर करतात. WordPress वर खूप सारे वेगवेगळे ऑपशन्स आहेत.

हे म्हणजे अगदी अँड्रॉइड मोबाईल वापरल्या सारखं. गाणी ऐकायची असतील तर आपण मोबाईलमध्ये music player इन्स्टॉल करतो तस आपल्याला जे हवंय ते आपण प्लॉगवर इन्स्टॉल करू शकतो.

याचे फायदे आणि तोटे आपण बघू.

फायदे

 • आधुनिक features
 • नियमित अपडेट्स
 • सुम्पूर्ण कंट्रोल
 • ब्लॉग साठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध

तोटे

 • होस्टिंग विकत घेतल्यानंतरच हे वापरता येत.
 • खर्चिक आहे
 • समजायला सुरवातीस वेळ लागतो.

आता आपल्याला ब्लॉगर आणि वर्डप्रेस यांच्यातील फरक समजला असेलच. आपण आपल्या सोईनुसार प्लॅटफॉर्म निवडू शकता.

मी तर सांगेन जर तुमच्यकडे ४००० पर्यंत बजेट असेल तरच तुम्ही वर्डप्रेस कडे या नाहीतर ब्लॉगरपासून सुरवात करा. ६०० पर्यंत बनवू शकता.

आता आपण बघू यातून पैसे कसे कमावता येतात हे आपण बघू.

ब्लॉगमधून पैसे कसे कमावता येतात?

ब्लॉग हा मुख्यतः आपले विचार मांडण्यासाठी बनवला जातो पण आज त्याच्यातून पैसे कमवणेही शक्य आहे. तर ते कसे? हे आता आपण बघू.

ज्यावेळी तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक(visitors) किंवा दर्शक यायला सुरवात होईल त्यावेळी google आपल्या ब्लॉग वर जाहिराती द्यायला सुरवात करत.

जितके जास्त व्हिसिटर्स तुमच्या ब्लॉगवर येतील तितके जास्त पैसे आपल्याला मिळतील.

सुरवातीचं जे payment असत ते १००$ म्हणजे ७०००/- RS च्या आसपास असत.

सुरवातीचे १००$ डॉलर बनवणं खूप कठीण असत कारण आपण या क्षेत्रात नवीन असतो, पूर्ण ज्ञान नसत.

पण तुम्ही चिंता करू नका कारण मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला ज्या अडचणी येतील त्या तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकता. त्याचबरोबर फेसबुक पेज वर विचारू शकता.

Conclusion

 • ब्लॉग म्हणजे अशी website ज्यावर माहिती प्रदर्शित होते.
 • ब्लॉग बनवण्यासाठी Domain + Hosting ची आवश्यकता असते.
 • ब्लॉगर आणि वर्डप्रेस हे ब्लॉग बनवण्याचे प्लॅटफॉर्म आहेत.
 • ब्लॉगवर जाहिरातीद्वारे आपण पैसे कमवू शकतो.

पोस्ट जास्त खोल मध्ये नाही लिहली याच कारण कि नवीन लोकांना डोक्यावरून गेल्यासारखं होईल.

तुम्हाला जे काहीं प्रश्न असतील ते तुम्ही कंमेंट मध्ये विचारू शकता.

येणाऱ्या पुढच्या पोस्ट

 1. Domain कस खरेदी करायचं?
 2. Hosting कस खरेदी करायचं?
 3. domain आणि hosting एकमेकांना कस जोडायचं?
 4. थिम कशी customize (design) करायची?
 5. पोस्ट कशी लिहायची?
 6. visitors (दर्शक) कसे वाढवायचे?
 7. SEO म्हणजे काय? तो कसा करतात?
 8. Google Adsense द्वारे आपल्या ब्लॉगवर जाहिरात कशी लावायची?
 9. ब्लॉग ला प्रसिद्ध कस करायचं?
 10. ब्लॉग मध्ये आधुनिक features कसे जोडायचे जस कि subscribe button, share button

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *