Traffic म्हणजे काय? ब्लॉग वर कसे आणतात?

या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत traffic म्हणजे काय ब्लॉग वर traffic कसे आणतात.

ब्लॉग Traffic म्हणजे काय?

आपल्या ब्लॉग वरती येणाऱ्या वाचकांना आपण ट्रॅफिक असे म्हणतो. आपण आपल्या ब्लॉगमध्ये विविध माहिती पोस्ट करत असतो ती माहिती वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. ते येणारे एकत्रित लोक म्हणजे ब्लॉग ट्रॅफिक.

ब्लॉग वरती येणारे ट्रॅफिक हे विविध घटकांवर अवलंबून असतं.

जस की तुमच्या ब्लॉग ची क्वालिटी, लेखनाची मांडणी, सोशल मीडिया कनेक्शन.

आता आपण बघू आपण कोणकोणत्या माध्यमातून ब्लॉग वर ट्रॅफिक अनु शकतो.

Traffic ची विविध मध्यम

आजकाल अपणल्याकडे खूप पर्याय आहेत ब्लॉग वर traffic आणण्याचे, ते आपण एक एक बघू.

  1. सोशल मीडिया
  2. Seo
  3. Push Notifications
  4. Email subscription

या मार्गाने आपण आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक अनु शकतो.

सोशल मीडिया

प्रत्येक न्यूज चॅनल च ट्रॅफिक जर आपण पाहिलं तर ते सोशल मीडिया मधून येत. मग ते facebook असो किंवा twitter असो.

सर्वच ब्लॉग चे जवळजवळ ९०% ट्रॅफिक हे सोशल मीडयाद्वारे येत असत.

Facebook

फेसबुक हा सर्वात उत्तम मार्ग आहे तुमच्या ब्लॉग वरती ट्रॅफिक आणण्याचा.

जवळपास सर्व लोकांकडे फेसबुक install असत आणि ते त्याचा रेगुलार वापर करत असतात.

तुम्ही तुमच्या ब्लॉग शी मिलतजुळत फेसबुक पेज बनवू शकता किंवा ग्रुप बनवू शकता.

त्या पेज किंवा ग्रुप वरती तुम्हाला तुमच्या blogpost च्या लिंक शेअर करायच्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून लोक तुमच्या ब्लॉग वर येतील.

फेसबुक च्या काही guideline आहेत त्यांना समजून घेऊन काम करन खूप महत्त्वाचं आहे.

जर तुम्ही ते फॉलो नाही केले तर तुमचा ब्लॉग फेसबुकवर block होऊ शकतो.

येणाऱ्या पुढच्या पोस्ट मधे आपण बघू डिटेल मधे फेसबुक वरून traafic कस मिळवायचं.

Twitter

जर तुमचा ब्लॉग न्यूजच्या सबंधित असेल किंवा तुम्हाला पत्रकारिता करायची असेल तर twitter हा उत्तम पर्याय आहे.

या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ते हे न्यूज मधे interested असतात. त्यामुळे पत्रकारिता करणाऱ्यांना भरभरून ट्रॅफिक भेटत.

trending topic वर लिहऱ्याना ही ट्विटर हा चांगला पर्याय आहे.

एकदा तुमचे फिल्लोअर वाढले की ट्रॅफिक ची चिंता करायची गरज नाही.

त्यासाठी तुम्हाला ट्विटर वर अक्टिव राहण खूप महत्त्वाचं आहे. आणि अक्टिव राहिलात तर च तुमचे follower वाढतील. Follower वाढले तरच ट्रॅफिक वाढेल.

Whatsapp

आज जितके स्मार्टफोन वापरकर्ते आहेत तितकेच व्हॉट्सअँप चे युजर्स आहेत.

सर्वात पॉप्युलर चॅटिंग ऍप मधे व्हॉटसअप च नाव 1 नं. ला येत.

जर तुम्ही सामाजिक जागरूकता या विषयी लिहीत असेल तर व्हॉट्सअँप वर पोस्ट शेअर करून तुम्ही भरभरून ट्रॅफिक मिळू शकता.

पोस्ट चांगली असेल तर ती viral होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात.

व्हॉट्सअँप वर स्टेटस किंवा direct मेसेज द्वारे आपण पोस्ट शेअर करू शकतो.

हे काही मार्ग होते सोशल मीडिया मधून ट्रॅफिक आणण्याचे.

आता आपण बघणार आहोत seo म्हणजे काय आणि त्याद्वारे ट्रॅफिक कस मिळवतात.

SEO म्हणजे काय?

सिओ चा फुल फॉर्म आहे search engine optimization.

आपण एखादी गोष्ट गूगल वर सर्च करतो त्यानंतर आपल्याला रिझल्ट दिसतो.

येणारे रिझल्ट हे क्रमाने मांडलेले असतात. ज्या website चा seo चांगला असतो ती वेबसाईट सर्च रिझल्ट मधे वर येते.

Seo बद्दल रीतसर आपण पुढच्या पोस्ट मधे शिकणार आहेत.

आता आपण seo म्हणजे इतच लक्षात ठेवू ज्याच्या seo चांगला असतो तो ब्लॉग किंवा वेबसाईट सर्च रिझल्ट मधे वर येते.

त्यामुळे गूगल वरून traffic मिळत. एकदा नीट seo केला की life time ट्रॅफिक येत राहत.

traffic ची आवश्यता

ब्लॉग मधे मेन इन्कम सोर्स असतो ad.

जितकं जास्त ट्रॅफिक आपल्या ब्लॉग वर येईल तितक्या जास्त अड शो होतील

आणि जितक्या जास्त अड शो होतील तितके जास्त पाऊस आपल्या मिळतील.

त्यामुळे जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या ब्लॉग वर आणण्याचा प्रयत्न आपण करत राहील पाहिजे.

कंटेंट छान लिहीत रहा तुमचे visitors तुमच्या ब्लॉग वर पुन्हा पुन्हा येत राहतील.ज

Summery

या पोस्ट द्वारे आपल्याला समजल असेल की ट्रॅफिक म्हणजे काय असत.

ट्रॅफिक आणण्याचे विविध मार्ग कोणते आहेत.

आणि ट्रॅफिक येणं का गरजेचं आहे.

1 Comment on "Traffic म्हणजे काय? ब्लॉग वर कसे आणतात?"

  1. Can you tell me how much total cost you spend on this domain+hosting per month/year ? You can email me on given address. Thanks 👍, by the way nic article|

Leave a comment

Your email address will not be published.


*