कोरोनाची टेस्ट कधी करावी?

सर्वांच्या मनात एक प्रश्न येत असेल कोरोनाची टेस्ट नक्की कधी करायची? कोणती लक्षण दिसल्यानंतर टेस्ट करण्याची गरज असते.

याबद्दलची सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत.

बॉलमराठी.कॉम मध्ये सर्वांचं स्वागत..

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे साधी शिंक जरी आली तरी मनात शंका येते कोरोना झाला कि काय?

घाबरून जाण्याचं काहीच काम नाही, कोरोनाची लक्षण आणि साधा सर्दी, ताप, खोकला यांची लक्षण हि बऱ्यापैकी सारखीच असतात.

मग ओळखायचं कस कि कोरोना झालाय कि नेहमीच सर्दी, ताप, खोकला झाला? पहिल्यांदा आपण दोघांमध्ये असणार फरक बघू..

कसा ओळखायचा कोरोना?

साधा सर्दी, ताप, खोकला हा कधीही येऊ शकतो. पण हे आजार येतात आणि ५-६ दिवसानंतर निघून जातात.

आणि ६-७ दिवसानंतरही ताप जात नाही याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला कोरोना झालेला आहे. फक्त शक्यता आहे त्यामुळे घाबरून जाऊ नये.

बऱ्याच लोकांना सर्दी झालीये, कुणाला खोकला झालाय त्यामुळे बरेच लोक विचारत आहेत हा कोरोना आहे का? तर याच उत्तर आहे नाही. फक्त सर्दी, खोकला हे कोरोनाच लक्षण नाही.

कोरोना हे एक प्रकारचं इन्फेकशन असल्यामुळे अंगात ताप राहणं स्वाभाविक आहे. कोरोना झालेल्या रुग्णामध्ये ताप हा मुख्यतः पाहायला मिळतो.

फक्त सर्दी, खोकला झाला म्हणजे कोरोणा झालंय असं होत नाही. कोरोना झाल्यावर अंगात ताप येतोच..

कोरोना झाल्यावर श्वास घेताताना त्रास होणे, श्वासांची गती वाढणे अशी लक्षण कोरोनाचा रुग्ण दुसऱ्या टप्प्यात असेल तर दिसून येतात.

श्वसनाचा कोणताही प्रॉब्लेम किंवा त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटून अगोदर टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण कोरोना हा श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा रोग आहे.

आपण मिनिटाला १० -१५ श्वास घेत असतो जर आपण त्याच्यापेक्षा जास्त श्वास घेत असू तर आपल्याला त्वरित टेस्ट करणं खूप गरजेचं आहे.

काही वेळा तापाबरोबर कोरडा खोकला येत असेल आणि तो ६-७ दिवसांच्यापेक्षा जास्त दिवस जात नसेल त्या परिस्थितीही कोरोनाची टेस्ट करन अत्यावश्यक आहे.

काही कोरोणा च्या रुग्णांमध्ये घसा दुखणे असे प्रकार आढळतात. त्यावेळी ही ताप असेल आणि तो ५-६ दिवस जात नसेल तरच कोरोणाची टेस्ट करावी.

नवीन झालेल्या संशोधनात अस समजलं कि कोरोना झालेल्या काही रुग्णांना वास घेण्यात आणि चव ओळखण्यात अडथळा येतो. ६-७ दिवसांपेक्षा जास्त ताप आणि वरील लक्षण दिसत असतील तरीही टेस्ट करण्याची गरज आहे.

काही केस मध्ये उलट्या येने, जुलाब अशी लक्षण दिसून अली आहे. त्यामुळे तापासोबतच अशी लक्षण असतील तरीही टेस्ट करून घ्यावी.

त्यामुळे मला सर्दी झाली, खोकला येतोय कोरोना झालाय का अशा शंका मनात अनु नका. कारण माणसाच्या मनात इतकी ताकद आहे जरी तुमच्या शरीरात रोग नसेल तरी ते मन विषाणू तयार करेल.

कोणी टेस्ट करू नये

  • ज्यांना फक्त सर्दी किंवा खोकला आहे आणि तो औषध घेतल्यानंतर कमी होत आहे.
  • ताप आहे पण औषध घेतल्यानंतर कमी होत आहे.
  • फक्त शिंका येत आहेत.
  • फक्त खोकला आहे.
  • घसा दुखत आहे.
  • आजारी आहे पण औषध घेतल्यानंतर कमी होत आहे.

जर वरीलपैकी कोणताही आजार तुम्हाला असेल आणि तो ४-५ दिवसात पूर्णपणे बरा होत असेल तर त्या परिस्थतीत तुम्हाला कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

काळजी कोणी घ्यायची?

काळजी सर्वानीच घेणं गरजेचं आहे कारण हा रोग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जर रुग्णानाची संख्या आपल्या दवाखान्याच्या रुग्णक्षमतेपेक्षा जास्त झाली तर बरे होणारे रुग्ण हि मृत्युमुखी पडतील आशी भीती आहे. .

म्हणूनच या रोगाला रोखणं फार महत्वाचं आहे. जितकं लवकर रोखू शकतो तितकं लवकर रोखणं गरजेचं आहे.

जे वृद्ध आहे किंवा ज्यांना आधीपासून कोणता ना कोणता आजार आहे त्यांची खूप काळजी घेणं महत्वाचं आहे.

हा रोग रोगप्रतिकार क्षमता कमी असणाऱ्या व्यक्तीवर जास्त हल्ला करतो.

या रोगामुळे मरण पावलेल्या लोकांमध्ये वृद्धांची संख्या हि खूपच जास्त आहे. त्यामुळे सर्व लोकांनी आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *